बिगबॉस फेम वीणा जगताप करणार ‘रमा राघव’ मालिकेत एन्ट्री

बिगबॉस फेम वीणा जगताप करणार ‘रमा राघव’ मालिकेत एन्ट्री

‘रमा राघव’ या लोकप्रिय अभिनेत्री वीणा जगताप एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांसमोर येत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

‘रमा राघव’ मालिका सध्या उत्कंठावर्धक टप्प्यावर असून मालिकेत येणारे एक नवे वळण प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. रमा राघवच्या यांच्या आयुष्यात विक्रम या नावाच्या पात्राचा प्रवेश झाला आहे.

‘रमा राघव’ या लोकप्रिय अभिनेत्री वीणा जगताप एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांसमोर येत आहे. रमा राघवचा सुरू झालेला वनवास आणि त्यात विक्रम या असुराचा प्रवेश या पार्श्वभूमीवर वीणाचे एक नवे पात्र मालिकेत प्रवेश करत आहे. लोकप्रिय अभिनेता अद्वैत दादरकर पाठोपाठ वीणाचा या मालिकेतील प्रवेश प्रेक्षकांसाठी सुखद धक्का आहे. कलर्स मराठीवरील ‘राधा प्रेम रंगी रंगली’ या मालिकेतून वीणाने टेलिव्हिजनवर पदार्पण केलं होत आणि बिग बॉसमधून ती लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली.त्यानंतर पुन्हा एकदा वीणा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

वीणाची नक्की कोणती भूमिका आहे ? रमा राघवच्या आयुष्यावर त्याचा काय प्रभाव पडणार? हे लवकरच समोर येणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com