Bigg Boss OTT 2 Winner: पहिल्यांदाच वाइल्ड कार्ड एल्विश यादव ठरला विजेता! रचला इतिहास

Bigg Boss OTT 2 Winner: पहिल्यांदाच वाइल्ड कार्ड एल्विश यादव ठरला विजेता! रचला इतिहास

14ऑगस्टला रात्री बिग बॉस फिनाले पार पडला.
Published by  :
shweta walge

14ऑगस्टला रात्री बिग बॉस फिनाले पार पडला. यात'राव साहब' म्हणजेच एल्विश यादव याने बाजी मारली. विशेष म्हणजे बिग बाॅस ओटीटी 2 चा फिनाले अत्यंत खास पद्धतीने पार पडला. सलमान खान याने बिग बाॅस ओटीटी 2 होस्ट केले आहे.

एल्विश यादवला 'बिग बॉस ओटीटी २' ची ट्रॉफी त्याचबरोबर २५ लाख रुपये रोख रक्कम बक्षीस स्वरूपात मिळाली. एल्विश यादवने 'बिग बॉस ओटीटी २' चे विजेतेपद मिळवून इतिहास रचला आहे. बिग बॉसच्या गेल्या १६ ते १७ वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच झाले आहे की, वाइल्डकार्ड स्पर्धकाने शो जिंकला आहे.

'बिग बॉस ओटीटी २' च्या फिनालेमध्ये सलमान खान यानेही म्हटले होते की, जर एल्विश जिंकला तर इतिहास बनेल. व्होट व फॅन फॉलोइंगच्या बाबतीत अभिषेक आणि एल्विश या दोघांमध्ये काट्याची टक्कर होती. फिनाले दरम्यान १५ मिनिटांसाठी लाइव वोटिंग लाइन सुरू करण्यात आली. त्यामध्ये टॉप-२ फायनलिस्ट म्हणजे अभिषेक मल्हन आणि एल्विश यादव यांच्यासाठी  वोटिंग झाली. सलमान खानने सांगितले की, एल्विश आणि अभिषेकमध्ये मतांसाठी अटीतटीचा सामना झाला मात्र यातमध्ये एल्विशने बाजी मारली.

दरम्यान, १७ जूनपासून सुरू झालेल्या 'बिग बॉस ओटीटी २' चा प्रवास १४ ऑगस्ट रोजी संपला. 

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com