बिपाशाच्या मुलीच्या हृदयाला होती 
दोन छिद्रं,अभिनेत्री लेकीबाबत म्हणाली...

बिपाशाच्या मुलीच्या हृदयाला होती दोन छिद्रं,अभिनेत्री लेकीबाबत म्हणाली...

बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासूने नोव्हेंबर 2022 मध्ये तिच्या मुलीला जन्म दिला, तिचे आणि करण सिंग ग्रोव्हरने मिळून तिचे नाव देवी ठेवले.
Published by  :
shweta walge

बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासूने नोव्हेंबर 2022 मध्ये तिच्या मुलीला जन्म दिला, तिचे आणि करण सिंग ग्रोव्हरने मिळून तिचे नाव देवी ठेवले. अभिनेत्री अनेकदा सोशल मीडियावर तिच्या मुलीसोबतचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. आता बिपाशा बसूने खुलासा केला आहे की, जेव्हा तिच्या मुलीचा जन्म झाला तेव्हा देवीच्या हृदयात छिद्र होते.

बिपाशा बसूची मुलगी देवी हिला जन्मताच व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट नावाचा आजार होता आणि याचा खुलासा बिपाशाने नेहा धुपियासोबत इंस्टाग्रामवर लाईव्हमध्ये केला होता. यादरम्यान बिपाशाने सांगितले की, 'मुलीच्या जन्मानंतर मला तिसर्‍या दिवशी कळले की तिच्या हृदयात दोन छिद्र आहेत. मी हे कोणाला सांगण्याचा विचार केला नव्हता, पण आज सांगत आहे. या खडतर प्रवासात अनेक मातांनी मला साथ दिली आहे. आधी आम्हाला सांगण्यात आले होते की, देवीच्या स्कॅनिंगद्वारे छिद्राचा आकार कळेल, परंतु नंतर आम्हाला शस्त्रक्रिया सुचवण्यात आली, जे बाळ तीन महिन्यांचे झाल्यानंतर केले जाते.

बिपाशाच्या मुलीच्या हृदयाला होती 
दोन छिद्रं,अभिनेत्री लेकीबाबत म्हणाली...
Face Masks Benefits: स्कीन मास्क वापरण्याचा त्वचेसाठी काय फायदा?

बिपाशाने सांगितले की, ती दर महिन्याला डॉक्टरांकडे स्कॅनिंगसाठी जात असे. छिद्र कमी होण्याची त्याने तीन महिने वाट पाहिली, पण शेवटी शस्त्रक्रियेचा पर्याय निवडला. यासाठी ती आणि करण अनेक डॉक्टरांना भेटले. अनेकवेळा हॉस्पिटलला भेट दिली. बिपाशाच्या म्हणण्यानुसार, करण त्याच्या मुलीच्या शस्त्रक्रियेसाठी अजिबात तयार नव्हता. मात्र, तिने पूर्ण तयारी केली होती. आपल्या मुलीला भविष्यात कशाला सामोरे जावे असे तिला वाटत नव्हते. या कारणास्तव, करणसह त्यांनी मुलीचे ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला, परंतु या जोडप्यासाठी मुलीला रुग्णालयात नेणे खूप कठीण होते. सध्या बिपाशा आणि करणची मुलगी आता पूर्णपणे बरी आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com