इतिहासात पहिल्यांदाच! बॉलिवूड इंडस्ट्री 'या' दिवशी राहणार बंद

इतिहासात पहिल्यांदाच! बॉलिवूड इंडस्ट्री 'या' दिवशी राहणार बंद

22 जानेवारी 2024 रोजी अयोध्यामध्ये प्रभू श्रीराम यांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या दिवशी कोणत्याही चित्रपटाचे शुटींग होणार नाही अशी माहिती समोर येत आहे.
Published by :
Team Lokshahi

गेल्या पाच शतकांपासून आपण सर्व भारतीय ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो, तो क्षण अवघ्या काही तासांवर आला आहे. 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्यामध्ये प्रभू श्रीराम यांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. हा क्षण संपूर्ण भारतीयांसाठी ऐतिहासिक ठरणार आहे, त्यासोबतच संपूर्ण देशभरात उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. या दिवशी देशात सार्वजनिकरीत्या सुट्टी जाहीर केली आहे. यावेळी इतिहासात पहिल्यांदाच बॉलिवूड इंडस्ट्रीदेखील यादिवशी बंद राहणार आहे. या दिवशी कोणत्याही चित्रपटाचे शुटींग होणार नाही अशी माहिती समोर येत आहे. या दिवशी बॉलीवूडमधील अनेक कलाकार अयोध्येला जाणार आहेत.

फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजने 22 जानेवारी 2024 रोजी सुट्टी जाहीर केली आहे. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडियाचे अध्यक्ष बी. एन. तिवारी यांनी प्रतिक्रिया दिली आहे, '22 जानेवारी 2024 रोजी सुट्टी जाहीर केली आहे. या दिवशी कोणत्याही चित्रपटाचं शुटींग होणार नाही. जर एखाद्या चित्रपटाचं शुटींग न केल्यामुळे जर मोठं नुकसान होणार असेल किंवा महत्त्वाचे असेल तर परवानगी मिळेल. त्यासाठी जे काही योग्य कारण असेल, ते नमूद करून विनंती पत्र पाठवावं लागेल. त्यानंतर परिस्थितीच गांभीर्य लक्षात घेऊन परवानगी दिली जाईल'. रामलल्लाचा प्राण प्रतिष्ठान सोहळा देशभरातील सर्व रामभक्तांना बघता यावा, यासाठी सत्तरपेक्षा जास्त शहरातील चित्रपटगृहांत लाईव्ह पाहायला मिळेल. यासाठी तुम्हाला 100 रूपये देऊन सिनेमागृहांमध्ये रामलल्लाचा प्राण प्रतिष्ठान सोहळा पाहायला मिळणार आहे.

या सोहळ्यासाठी बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन, अनुपम खेर, अजय देवगण, सनी देओल, हेमा मालिनी, रणबीर कपूर, आलिया भट,मधुर भांडारकर यांच्यासह संजय लीला भन्साळी यांनादेखील आमंत्रित केलं आहे. साऊथ चित्रपटातील मेगास्टार चिरंजीवी, रजनीकांत, ऋषभ शेट्टी, यश, प्रभास आणि मोहनलाल यांनादेखील या भव्य सोहळ्यासाठी आमंत्रित केले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com