गायक शुभनीत सिंगच्या पोस्टवरून गदारोळ; मुंबईतील शो रद्द, काय आहे नेमके प्रकरण?
भारत आणि कॅनडा दरम्यान सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन तिकीट बुकिंग अॅप बुक माय शोने गायक शुभनीत सिंगच्या भारतातील सर्व शो रद्द केले आहेत. शुभनीत सिंगच्या इन्स्टाग्राम पोस्टच्या वादानंतर बुक माय शोने हे पाऊल उचलले आहे.
शुभनीत सिंगचा कॉन्सर्ट मुंबईतील कॉर्डेलिया क्रूझवर २३ ते २५ सप्टेंबर दरम्यान होणार होता. पण भारत आणि कॅनडा दरम्यान सुरू असलेल्या तणावाबाबत इंस्टाग्रामवर पोस्ट पोस्ट करणे गायकाला इतके महागात पडले आहे. शोच्या पार्श्वभूमीवर ट्विटरवर #UninstallBookMyShow ट्रेंड करत होता. यानंतर बुक माय शोने शुभनीत सिंगचा 'स्टिल रोलिन' टूर फॉर इंडिया रद्द करण्यात आला आहे. बुक माय शोने शोसाठी तिकीट खरेदी केलेल्या सर्व ग्राहकांना तिकिटाची संपूर्ण रक्कम परत करणे सुरू केले आहे. हा परतावा सात ते दहा दिवसांत सर्वांना मिळेल, असे ट्विटरवर सांगितले आहे.
शुभनीत सिंग कोण आहे?
शुभनीत सिंग यांचा जन्म पंजाबमध्ये झाला होता. सध्या तो कॅनडामध्ये राहत आहे. हा गायक त्याच्या चाहत्यांमध्ये शुभ नावाने प्रसिद्ध आहे. शुभनीतने एका पोस्टमध्ये भारताचा चुकीचा नकाशा अपलोड केला होता. ज्यामध्ये देशातील केंद्रशासित प्रदेश, जम्मू-काश्मीर, पंजाब आणि पूर्वोत्तर राज्ये नव्हती. हे शेअर करताना त्यांनी लिहिले, 'पंजाबसाठी प्रार्थना करा.' यावरुन शुभनीतला लोकांच्या नाराजीला सामोरे जावे लागत आहे. एवढेच नाही तर क्रिकेटर विराट कोहलीने त्याला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले आहे.