Chhava Movie Review : अक्षरशः अंगावर काटा अन् डोळ्यात पाणी आणणारा चित्रपट! कसा आहे छत्रपती शिवरायांचा 'छावा'
Review(4.5 / 5)
चित्रपटातले कलाकार आणि पात्र:
'छावा' चित्रपटात विकी कौशल, रश्मिका मंदाना यांच्यासोबत अक्षय खन्ना मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत विकी कौशल पाहायला मिळत आहे. तसेच अक्षय खन्नाने औरंगजेबाची भूमिका साकारली आहे. तर दिव्या दत्ता राजमाता सोयराबाईंच्या भूमिकेत आहेत. त्याचसोबत रश्मिका मंदाना महाराणी येसूबाई यांची भूमिका साकारली आहे. तसेच सिनेमात मराठी कलाकारांची फौज पाहायला मिळते आहे. संतोष जुवेकर, शुभंकर एकबोटे, नीलकांती पाटेकर, आस्ताद काळे, सुव्रत जोशी, सारंग साठ्ये, किरण करमरकर,मनोज कोल्हटकर हे मराठी कलाकार मराठा सरदारांच्या भूमिकेत झळकले आहेत.
चित्रपटाची कथा:
हा चित्रपट पुर्णपणे छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनगाथेवर करण्यात आला आहे. ज्यात संभाजी महारांच्या शौर्याची गाथा दाखवली गेली आहे. त्याचसोबत महाराणी येसूबाई आणि महाराज संभाजीराजे यांच्यात नात्यात असलेला आदर, एकमेकांविषयीची आत्मीयता, प्रेम हे खूप सुंदरपणे चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांसोबत वयाच्या नऊव्या वर्षी दिल्लीला गेले होते. त्यावेळी त्यांना दिल्लीत औरंगजेबाने कैद केले होते. मात्र शिवरायांना आपल्या मुलाला दिल्लीत सोडावं लागलं आणि त्यांना स्वत:ला स्वराज्यात यावं लागलं. अखेर दोन महिन्यांनी संभाजीराजे आपल्या घरी परतले होते. औरंगजेबाने संभाजी महाराजांचे कैदेत असताना खूप हाल केले. संभाजी महाराजांचे हाल करताना त्यांच्या किंकाळ्या ऐकू याव्यात यासाठी औरंगजेब खूप आसूसलेला होता. मात्र संभाजी महाराज शेवटपर्यंत झुकले नाहीत ज्यामुळे संभाजीराजेंवर होणारे वार औरंग्याच्या मनाला खोलवर रुतायचे. संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील युद्धाची आणि महाराजांच्या बलिदानाची शौर्यगाथा या चित्रपटात दाखवण्यात आलेली आहे.
चित्रपटाचा रिव्ह्यू:
या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटाने प्रदर्शनच्या पहिल्याच दिवशी तब्बल 19.08 कोटी रुपये कमवले आहेत. हा चित्रपट बघताना खूप यातना होतील. शेवटच्या अर्ध्या तासात तर खूप रडू येईल. या चित्रपटात विकी कौशलने संभाजी महाराजांचे पात्र जिवंत डोळ्यासमोर उभे केले आहे. त्यामुळे विकी कौशल याचं नाव आता बॉलिवू़डमध्ये खूप वरच्या स्थानी गेलं आहे. तसेच अक्षय खन्ना याने साकारलेला औरंगजेब हा अंगावर काटा आणणारा आहे. त्याची चाल, त्याची नजर, त्याचा करारा आवाज हा अगदी शाळेत असताना पुस्तकात दाखवल्याप्रमाणे आहे. त्यामुळे अक्षय खन्नामध्ये हुबेहुब औरंगजेबाची छबी पाहायला मिळते. यासोबतच हंबीरराव मोहिते, कवी कलश आणि इतर मराठा सरदारांच्या भूमिका खूप चांगल्या पद्धतीने साकारण्यात आल्या आहेत.
या चित्रपटाने पहिल्या कमाईत 'इमर्जन्सी', 'आझाद' या चित्रपटांना मागे टाकत 2.5 कोटी आणि 1.5 कोटी रुपयांची कमाई केली. त्याचसोबत 5.5 कोटींसह प्रदर्शित झालेल्या 'देवा' या चित्रपटाला देखील छावाने मागे अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'लव्हयापा' आणि 'बॅडएस रवीकुमार' या चित्रपटांना देखील छावाने मागे टाकलं आहे. आता पर्यंत बॉक्स ऑफिसवर छावाने 100 करोडची भरारी घेतली आहे.