चिरंजीवीच्या 'गॉडफादर' चित्रपटाचा टीझर रिलीज; स्टंट करताना दिसला सलमान खान

चिरंजीवीचा 'गॉडफादर' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे. 'गॉडफादर' हा सिनेमा 'लूसिफर' या ब्लॉकबस्टर मल्याळम सिनेमाचा रिमेक आहे. सध्या अनेक दाक्षिणात्य चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

चिरंजीवीचा 'गॉडफादर' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे. 'गॉडफादर' हा सिनेमा 'लूसिफर' या ब्लॉकबस्टर मल्याळम सिनेमाचा रिमेक आहे. सध्या अनेक दाक्षिणात्य चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

या चित्रपटात चिरंजीवीसोबत भाईजान सलमान खान देखिल दिसणार आहे. हा चित्रपट पुरेपुर अॅक्शनने भरलेला असल्याचे ट्रेलवरुन दिसून येत आहे. 'गॉडफादर'चा दिमाखदार टीझर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

'गॉडफादर' सिनेमाच्या टीझरमध्ये सलमानचा एक वेगळा अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. काही स्टंट करताना तो दिसत आहे. सलमान खान दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. त्यामुळे भाईजानचे चाहते या सिनेमाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

चिरंजीवीच्या 'गॉडफादर' चित्रपटाचा टीझर रिलीज; स्टंट करताना दिसला सलमान खान
अनुपम खेर यांनी आमिरवर साधला जोरदार निशाणा....
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com