कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका; रुग्णालयात दाखल

कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका; रुग्णालयात दाखल

प्रसिद्ध कॉमेडियन आणि उत्तर प्रदेश फिल्म डेव्हलपमेंट कौन्सिलचे अध्यक्ष राजू श्रीवास्तव यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वर्कआउटच्या दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते ट्रेडमिलवरून पडले. त्यांना दिल्लीतील 'एम्स' रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

प्रसिद्ध कॉमेडियन आणि उत्तर प्रदेश फिल्म डेव्हलपमेंट कौन्सिलचे अध्यक्ष राजू श्रीवास्तव यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वर्कआउटच्या दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते ट्रेडमिलवरून पडले. त्यांना दिल्लीतील 'एम्स' रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना सौम्य हृदयविकाराचा झटका आला होता पण आता त्यांची प्रकृती ठीक आहे. लवकरच त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळू शकतो. पुढील ४८ तास निरीक्षणाखाली ठेवल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाऊ शकतो.

कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आल्याच्या वृत्तानंतर त्यांचे चाहते चांगलेच चिंतेत पडले होते. सोशल मीडियावर पोस्ट करून प्रत्येकजण आपल्या आवडत्या अभिनेत्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहे. राजू श्रीवास्तव लवकर बरे व्हावेत अशी त्यांची इच्छा आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com