हास्यजत्रेच्या मंचावर येणार कॉमेडी किंग जॉनी लीवर

हास्यजत्रेच्या मंचावर येणार कॉमेडी किंग जॉनी लीवर

Published by :
Published on

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा सगळ्यांचा लाडका कार्यक्रम १८ जुलैपासून, दर रविवारी रात्री ८ ते १० असा २ तासांची 'रविवारची हास्यजत्रा' या नावाने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. १८ जुलैला 'रविवारची हास्यजत्रा'च्या भागात कॉमेडी किंग दस्तुरखुद्द जॉनी लीवर येणार आहेत.

जॉनी लिव्हर यांना नम्रता साकारत असलेलं लॉली हे पात्र अतिशय आवडतं. कॉमेडी किंग येणार आणि मंचावर येणार नाहीत असं कसं शक्य आहे? या भागात हास्याच्या मंचावर कॉमेडी किंग जॉनी लीवर यांची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

कोरोनाकाळात लोकांना हसत ठेवण्याचे काम केल्या बद्दल 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' च्या सर्व कलाकारांचा मुख्यमंत्र्याच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com