Chhaava Movie : सिनेमागृहात 'छावा' चित्रपट सुरु असतानाच प्रेक्षकाचा गोंधळ, पडदाही फाटला आणि....

Chhaava Movie : सिनेमागृहात 'छावा' चित्रपट सुरु असतानाच प्रेक्षकाचा गोंधळ, पडदाही फाटला आणि....

औरंगजेबाच्या सीनवर प्रेक्षकाचा ताबा सुटला, सिनेमागृहात गोंधळ
Published by :
Team Lokshahi
Published on

'छावा' चित्रपटांने बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली आहे. या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांमध्ये १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. यादरम्यान गुजरातमधील भरूच येथील एका सिनेमागृहात 'छावा' चित्रपट सुरु असताना एक अजब घटना घडली आहे.

रविवारी यात्री आरेक सिनेमागृहात रात्री ११. ४५ वाजताचा शो सुरु असताना एका प्रेक्षकाने चित्रपटगृहाचा पडदा फाडला. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ सोशलमिडीयावर व्हायरल होत आहे. चित्रपटात औरंगजेब छत्रपती संभाजी महाराज यांचा छळ करत असतानाचा सीन सुरू असताना सदर प्रेक्षक चवताळला आणि त्याने चित्रपटगृहाच्या पडदा फाडला.

सध्या चर्चेत असलेला 'छावा' चित्रपट १४ फेब्रुवारीला प्रदर्शित झाल्यानंतर 'छावा' ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटामध्ये विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. त्याचबरोबर रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाई यांची भूमिका साकारली आहे. तसेच अक्षय खन्नाने औरंगजेबाची भूमिका तर दिव्या दत्ता राजमाता सोयराबाईंच्या भूमिकेत दिसून येत आहेत.

या सिनेमात मराठी कलाकारांची फौज पाहायला मिळते आहे. संतोष जुवेकर, शुभंकर एकबोटे, नीलकांती पाटेकर, आस्ताद काळे, सुव्रत जोशी, सारंग साठ्ये, किरण करमरकर,मनोज कोल्हटकर हे मराठी कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसून आले आहेत.

भरूच अ विभागाचे पोलीस अधिकारी म्हणाले, "चित्रपटाच्या शेवटी छत्रपती संभाजी महाराज यांना औरंगजेबाने कैद केल्याचे दाखवले आहे. या प्रसंगानंतर औरंगजेब संभाजी महाराजांचा छळ करत असतो. यावेळी सदर प्रेक्षक चवताळला आणि त्याने पडद्यावर दिसणाऱ्या औरंगजेबावर हल्ला केला. एका प्रेक्षकाने चित्रपटगृहाच्या पडद्याचे नुकसान केले आहे". असंभरूच अ विभागाचे पोलीस अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com