कोरोना आणि रामदेव बाबा सारखेच; राखी सावंतने केली तुलना

कोरोना आणि रामदेव बाबा सारखेच; राखी सावंतने केली तुलना

Published by :
Published on

राखी सावंत वादग्रस्त वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असते. राखीने कोरोनाची तुलना ही योगगुरु रामदेव बाबा यांच्याशी केली आहे. सेलिब्रिटी फोटोग्राफर 'विरल भयानी' या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. राखीने पोल्का डॉटचा काळ्या रंगाचा टॉप परिधान केला आहे. "अरे देवा, हा करोना आहे ना…करोना म्हणजे एकदम बाबा रामदेव यांच्यासारखा आहे. करोना कधी येतो, कधी लपतो तर कधी बाहेर निघून जातो," असे राखी म्हणाली. राखीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

रामदेव बाबा यांनी अ‍ॅलोपथी औषधांविरुद्ध वक्तव्य केल्याचा आणि पतंजलीच्या कोरोनिल किटमुळे कोविड-१९ बरा होतो, असा दावा त्यांनी केला होता. यामुळे डॉक्टरांकडून नाराजी व्यक्त केली जातं आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com