जयाप्रदा यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; नेमकं काय आहे प्रकरण?

जयाप्रदा यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; नेमकं काय आहे प्रकरण?

ज्येष्ठ अभिनेत्री जयाप्रदा अडचणीत सापडल्याचं समजत आहे. वास्तविक, न्यायालयाने जयाप्रदा यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. हे
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

ज्येष्ठ अभिनेत्री जयाप्रदा अडचणीत सापडल्याचं समजत आहे. वास्तविक, न्यायालयाने जयाप्रदा यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. हे प्रकरण 2019 सालचे असल्याचे समोर आले. वास्तविक, 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जयाप्रदा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी अजामीनपत्र वॉरंट जारी करण्यात आले आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

2019 साली लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जयाप्रदा यांच्यावर आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप होता. हे प्रकरण रामपूरच्या एमपीएमएलए कोर्टात प्रलंबित आहे. या प्रकरणी गेल्या अनेक तारखांपासून जयाप्रदा कोर्टात हजर होत नव्हत्या. यानंतर अजामीनपत्र वॉरंट जारी केल्यानंतरही जयाप्रदा यांना न्यायालयात हजर राहिल्या नाहीत.

यामुळे न्यायालयाने 17 नोव्हेंबर ही तारीख निश्चित केली आहे. अजामीनपत्र वॉरंटही सुरू ठेवण्यात आले आहे. न्यायालयाने जयाप्रदा यांना 17 नोव्हेंबर रोजी रामपूर न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे. अद्याप यावर जयाप्रदा यांनी कोणतेही वक्तव्य जारी केलेले नाही.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com