india's got latent : आशिष चंचलानीची याचिका रद्द करण्याची मागणी
सध्या समय रैनाचा शो 'इंडियाज गॉट लॅटेंट' खूप चर्चेत आहे. या शोमध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे प्रसिद्ध युट्यूबर रणवीर अलाहबादियाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्याच्यावर अनेक गुन्हेदेखील नोंदवले गेले. त्याचप्रमाणे समय रैनावर देखील गुन्हे दाखल केले. मात्र आता युट्यूबर आशीष चंचलानीच्या अडचणीमध्येही वाढ झाल्याचे समोर आले आहे.
'इंडियाज गॉट लॅटेंट' या शोमध्ये अश्लीलतेचा प्रचार केल्याबद्दल गुवाहाटी येथे आशीष चंचलानीच्या विरोधात एफआयआर दाखल केली आहे. मात्र ही एफआयआर रद्द करावी किंवा मुंबईमध्ये हस्तांतरित करण्यात यावी अशी याचिका आता दाखल करण्यात आली आहे.
न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन कोटिश्वर सिंह यांच्या खंडपीठाने या प्रकरणी नोटीस बजावली आहे. त्यांनी ही याचिका रणवीर अलाहाबादिया यांच्या प्रलंबित याचिकेसोबत जोडली आहे. या प्रकरणात चंचलानीला जामीन मिळाला आहे. यावर आशिषच्या वकिलाने सांगितले की, ते एका विशिष्ट शोसाठी अनेक एफआयआर दाखल करण्याच्या विरोधात आहेत.