Dharmaveer 2: ‘धर्मवीर २’ची अधिकृत घोषणा, पहिलं पोस्टर समोर

Dharmaveer 2: ‘धर्मवीर २’ची अधिकृत घोषणा, पहिलं पोस्टर समोर

आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित धर्मवीर चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर धर्मवीर 2 ची घोषणा करण्यात आली आहे.
Published by  :
Team Lokshahi

आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित धर्मवीर चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर धर्मवीर 2 ची घोषणा करण्यात आली आहे. मंगेश देसाई यांनी इंस्टा पोस्ट शेअर करत ही बातमी दिली आहे. धर्मवीर 2 मध्ये साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट रसिकांसमोर मांडली जाणार आहे. या सिनेमाचे लेखन दिग्दर्शनही प्रवीण तरडे सांभाळणार आहेत. दरम्यान पहिल्या भागाच्या शेवटालाच धर्मवीर 2 चे संकेत देण्यात आले होते.

प्रवीण तरडे दिग्दर्शित अन प्रसाद ओक यांची मुख्य भूमिका असलेला ‘धर्मवीर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवनपट या सिनेमातून प्रेक्षकांच्या समोर ठेवण्यात आला होता. आता या चित्रपटाचा सिक्वल ‘धर्मवीर २’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. निर्माते मंगेश देसाई यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून घोषणा करत ही बातमी दिली.

अनेक दिवसांपासून सुरु असलेली चर्चा आता प्रत्यक्षात उतारणार. सांगण्यास अतिशय आनंद होत आहे की, जेजुरी येथील खंडोबाचे दर्शन घेऊन आज तुमच्या सर्वांच्या प्रेमाने आणि आशीर्वादने 'धर्मवीर २' ची आज मी अधिकृत घोषणा करत आहे, असे मंगेश देसाई म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com