'Dharmaveer 2' : "धर्मवीर'च्या तुफान यशानंतर आता 'धर्मवीर २'

'Dharmaveer 2' : "धर्मवीर'च्या तुफान यशानंतर आता 'धर्मवीर २'

'धर्मवीर २' मधून उलगडणार 'साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट...'
Published by  :
Siddhi Naringrekar

स्वर्गीय आनंद दिघे यांचा जीवनप्रवास 'धर्मवीर... मुक्काम पोस्ट ठाणे' या चित्रपटातून मांडण्यात आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्यामुळे चित्रपट बॉक्स ऑफिसवरही तुफान यशस्वी ठरला. धर्मवीरच्या या दिमाखदार यशानंतर जेजुरी येथील खंडोबाचे दर्शन घेऊन 'धर्मवीर २'ची घोषणा निर्माते मंगेश देसाई यांनी केली.

"धर्मवीर" चित्रपटाच्या यशानंतर 'धर्मवीर २' ची चर्चा सुरू झाली होती. अखेर ही चर्चा केवळ चर्चा न राहता आता प्रत्यक्षात उतरण्यास सज्ज झाली आहे. साहील मोशन आर्ट्स या निर्मिती संस्थेद्वारे मंगेश देसाई या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. मंगेश देसाई यांनीच धर्मवीर चित्रपटीचीही निर्मिती केली होती . "धर्मवीर" चित्रपटाच्या यशात उत्तम स्टारकास्टसह लेखन, दिग्दर्शनही महत्त्वाचं ठरलं होतं. अनेक पुरस्कारही या चित्रपटला मिळाले होते. प्रवीण तरडेच "धर्मवीर २" चे लेखन, दिग्दर्शन करणार असल्यानं हा चित्रपटही दमदार होईल यात शंका नाही.

पोस्टरवर भगव्या बॅकग्राऊंडवर 'धर्मवीर २' "साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट..." अशी टॅगलाईन नमूद करण्यात आली आहे. त्यामुळे हा चित्रपट धडाकेबाज पद्धतीने आणि रंजक कथानकाद्वारे हिंदुत्त्वावर भाष्य करणारा असल्याचा प्राथमिक अंदाज बांधता येत आहे. चित्रपटात कलाकार कोण असणार हे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र "धर्मवीर २" च्या घोषणेमुळे चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com