‘जेठालाल’च्या मुलीचा थाटामाटात पार पडला लग्न सोहळा, पाहा खास VIDEO
तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) जेठालालची भूमिका साकारणारे अभिनेते दिलीप जोशी (Dilip Joshi ) यांची लाडकी लेक नियती नुकतीच लग्नबंधनात अडकली. गेल्या 11 डिसेंबरला नियतीचा लग्नसोहळा अगदी थाटामाटात पार पडला. या शाही लग्नाच्या प्री-वेडिंग सेरेमनीचे फोटो तुम्ही पाहिले असतीलच. आता लग्नाचे फोटो समोर आले आहेत. दिलीप जोशी यांनी स्वत: लेकीच्या लग्नाचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
दिलीप जोशी यांनी मुलीच्या लग्नातील काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर करून त्याला कॅप्शन दिले, 'नियतीला आणि आमच्या कुटुंबातील नवा सदस्य यशोवर्धनला पुढील वाटचालीसाठी खुप शुभेच्छा. आमच्यासोबत राहुन आमच्या मुलांना आशीर्वाद दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. जय स्वामीनारायण '
पत्नी जयमाला जोशी यांच्यासोबतचे फोटो दिलीप सोशल मीडियावर नेहमी शेअर करतात. मालिकेमधील द्या ही भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानीसोबतच्या दिलीप यांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. एका मुलाखतीमध्ये दिलीप यांनी सांगितले होते की, 'मला रोज अनेक लोक विचारत होते की दिशा माझी पत्नी आहे का? मी त्यांना सांगतो की जयमाला ही माझी पत्नी आहे.' 28 जुलै 2008 रोजी तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. गेली 13 वर्ष ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील जेठालाल, सोढी, अंजली भाभी, दयाबेन, डॉ. हाथी आणि भिडे या भूमिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.