Aamir Khan & Juhi Chawla
Aamir Khan & Juhi ChawlaLokshahi Team

या कारणामुळे आमिर आणि जुही झाले विभक्त

आमिर आणि जुही बद्दल काही गोष्टी उघड...
Published by :
Published on

बॉलिवूडमध्ये एक वेळ अशी होती की आमिर खान (Amir Khan) आणि जुही चावला (Juhi Chawla) ही जोडी परफेक्ट जोडी म्हणून नामांकित होती.

जुही आणि आमीरने अनेक चित्रपटांमध्ये सोबत काम केलेलं आहे. ' कयामत से कयामत तक ' त्यानंतर ' हम हैं राही प्यार के ', ' लव लव लव्ह ' अशा बऱ्याच चित्रपटांच्या माध्यमातून ही परफेक्ट जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस आली.

Aamir Khan & Juhi Chawla
' KGF 2 ' च्या हिंदी व्हर्जनने केला इतक्या कोटींचा गल्ला पार

त्यानंतर 'इश्क' या चित्रपटात दोघांनी काम केलेलं आहे. या चित्रपटात अजय देवगन (Ajay Devgan) व त्याची बायको काजलने Kajol) देखील काम केलेलं आहे. या चित्रपटानंतर त्या दोघांनी कधीही सोबत काम केलं नाही. यामागचं कारण तसच आहे.

Aamir Khan & Juhi Chawla
'KGF 3' विषयी काय म्हणाला 'रॉकी भाई'

शूटिंग दरम्यान सेटवर अमीर आणि जुही या दोघांमध्ये असं काही घडलं की त्यानंतर जुही आमिरवर नाराज झाली होती.

मला ज्योतिष बघता येतं असं म्हणत आमिरने जुहीला हात पुढे करायला लावलं. आणि जुहीने हात पुढे करताच आमीर तिच्या हातावर थुंकला होता. जुहीला हे मजाक सहन झालं नाही. म्हणून तिने कामावर येणार देखील टाळलं होतं.

शूटिंग अर्धवट राहिल्याने जुहीची समजूत काढल्याशिवाय पर्याय नव्हता. यानंतर अजय सोबत अमीर जुहीच्या घरी गेला होता. यादरम्यान आपण केलेल्या चुकीची आमीरने माफी मागितली होती. चित्रपटाचं संपूर्ण शूटिंग झाल्यानंतर जुही चावलाने आमीरच्या संपर्कात राहणं टाळलं. ते दोघेही तब्बल सात वर्ष एकमेकांवर नाराज होते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com