Disha Patani : अभिनेत्री दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींचा एन्काऊंटर
थोडक्यात
अभिनेत्री दिशा पाटणीच्या घरावरील गोळीबार प्रकरण
गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काऊंटर
दिशा पाटणीच्या उत्तर प्रदेशमधील बरेलीच्या घरावर झाला होता गोळीबार
(Disha Patani) बॉलीवूड अभिनेत्री दिशा पाटनीच्या बरेली येथील घराबाहेर गोळीबार झाला होता. या प्रकरणात आता गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काऊंटर करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. दिल्ली पोलिसांचा स्पेशल सेल, हरियाणा एसटीएफ आणि उत्तर प्रदेश एसटीएफ यांनी गाझियाबादमधील ट्रोनिका सिटी परिसरात संयुक्त कारवाई केली असता झालेल्या चकमकीत हे दोघे ठार झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठार झालेल्यांची ओळख रविंद्र उर्फ कल्लू (रोहतक) आणि अरुण (सोनीपत, हरियाणा) अशी झाली आहे. हे दोघे रोहित गोदारा आणि गोल्डी ब्रार टोळीतील सक्रिय सदस्य होते. आरोपींनी अटक टाळण्यासाठी पोलिसांवर गोळीबार केला होता. यामध्ये हरियाणा पोलिसांची एक गाडी नुकसानग्रस्त झाली तर दिल्ली पोलिसांचा एक अधिकारी जखमी झाला.
11 आणि 12 सप्टेंबर रोजी पटानीच्या बरेलीतील सिव्हिल लाईन्स भागातील घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या तपासादरम्यान, वापरलेल्या मोटारसायकलच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा माग काढला होता. यानंतर पोलिसांनी मिळून त्यांच्यावर पाळत ठेवून कारवाई केली. चकमकीत दोघे गंभीर जखमी झाले आणि रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेमुळे बरेलीत मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी टोळीयुक्त गुन्हेगारीवर कठोर कारवाई सुरू असल्याचा इशारा दिला आहे. अधिकारी म्हणाले की, या हल्ल्याचा तपास पुढे सुरू असून उर्वरित साथीदारांचा शोध घेतला जात आहे.