Siddharth Malhotra Birthday
SIDDHARTH MALHOTRA BIRTHDAY WISHES FROM VVAN: FORCE OF THE FOREST PRODUCERS

Siddharth Malhotra Birthday: सिद्धार्थ मल्होत्राच्या वाढदिवसानिमित्त 'VVAN: फोर्स ऑफ द फॉरेस्ट’च्या निर्मात्यांकडून खास शुभेच्छा

VVAN Force Of The Forest: सिद्धार्थ मल्होत्राच्या वाढदिवसानिमित्त ‘VVAN: फोर्स ऑफ द फॉरेस्ट’च्या निर्मात्यांकडून खास शुभेच्छा.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

शुक्रवारी बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या खास प्रसंगी त्याच्या आगामी चित्रपट ‘VVAN: फोर्स ऑफ द फॉरेस्ट’च्या निर्मात्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला अनोख्या अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

निर्मात्यांनी शेअर केलेल्या खास पोस्टमध्ये त्यांनी लिहिले, “काही शक्ती निर्माण केल्या जात नाहीत, त्या जन्मतःच असतात आज जंगल त्याचं नाव आधीपेक्षा अधिक जोरात पुकारत आहे. @sidmalhotra, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

‘VVAN: फोर्स ऑफ द फॉरेस्ट’ हा चित्रपट लोककथा (फोकलोर) प्रेरित अ‍ॅडव्हेंचर असल्याचं सांगितलं जात आहे. भारतीय पौराणिक कथा आणि ग्रामीण लोककथांशी खोलवर जोडलेली ही कथा आहे. रहस्यमय आणि दृश्यात्मकदृष्ट्या प्रभावी जंगलाच्या पार्श्वभूमीवर आधारित या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा एका ‘संरक्षक’च्या भूमिकेत दिसणार आहे. तो प्राचीन रहस्यांनी भरलेल्या या भूमीचं बाहेरून येणाऱ्या धोक्यांपासून संरक्षण करताना दिसेल. पारंपरिक कथेला सुपरनॅचरल घटकांची जोड देत हा चित्रपट पौराणिकता, अ‍ॅक्शन आणि ड्रामाचा प्रभावी संगम सादर करण्याचं आश्वासन देतो.

या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रासोबत तमन्ना भाटिया प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. त्याचबरोबर मनीष पॉल, श्वेता तिवारी यांसारखे अनेक महत्त्वाचे कलाकारही या चित्रपटाचा भाग आहेत. पंचायतसारखी लोकप्रिय वेबसीरिज घडवणारे अरुणाभ कुमार आणि दीपक कुमार मिश्रा यांनी या चित्रपटाचं सह-दिग्दर्शन केलं आहे. शोभा कपूर आणि एकता कपूर यांच्या बालाजी मोशन पिक्चर्सने TVF आणि 11:11 प्रोडक्शन्सच्या सहकार्याने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. दमदार कथाकथन आणि भव्य सिनेमॅटिक दृष्टीकोन यांचा संगम असलेला हा प्रकल्प एक दुर्मिळ आणि महत्त्वाकांक्षी सहकार्य म्हणून पाहिला जात आहे.

Summary

• सिद्धार्थ मल्होत्राच्या वाढदिवसानिमित्त निर्मात्यांकडून खास शुभेच्छा
• ‘VVAN: फोर्स ऑफ द फॉरेस्ट’ लोककथा प्रेरित अ‍ॅडव्हेंचर चित्रपट
• तमन्ना भाटिया, मनीष पॉल, श्वेता तिवारी प्रमुख भूमिकेत
• बालाजी मोशन पिक्चर्स, TVF आणि 11:11 प्रोडक्शन्सच्या सहकार्याने निर्मिती

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com