प्रसिद्ध गायक मंगेश बोरगावकरची सांगितिक दिवाळी पाडवा भेट

प्रसिद्ध गायक मंगेश बोरगावकरची सांगितिक दिवाळी पाडवा भेट

Published by :
Published on

मुंबई- कोरोनाचा प्रादुर्भाव काही अंशी कमी झाल्याने यंदा दिवाळी सण सगळीकडे उत्साहात साजरा होत आहे. कलाकारांसाठी देखील ही दिवाळी उत्साहवर्धक आहे. दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आणि
कोविड मधील नैराश्य दूर करण्यासाठी सुप्रसिद्ध गायक मंगेश बोरगांवकर आपल्या रसिकांसाठी एक खास सांगीतिक मेजवानी घेऊन आला आहे.

"उजळे पणती" हे दिवाळीच अत्यंत सुंदर वर्णन करणारं गाणं घेऊन मंगेश रसिकांसमोर आला आहे. या गीताची रचना डॉ रामेश्वरी अल्हाबादे यांची असून संगीत तरुण संगीतकार मिहीर थत्ते यांचं आहे. मंगेशचा प्रसन्न व गोड आवाज या गीताचे सौंदर्य अजून खुलवतो.

दिवाळीच्या फराळासोबत मंगेश बोरगावकरच्या 'उजळे पणती'ने ही दिवाळी गोड होणार अशी दाद श्रोत्यांकडून मिळत आहे. हे गाणं सर्व म्युझिक पोर्टल्सवर व यूट्यूब वर ही याचा सुंदर व्हिडिओ उपलब्ध आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com