maharashtrachi hasya jatra
maharashtrachi hasya jatraTeam Lokshahi

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' चाहत्यांचा निरोप घेणार?

महाराष्ट्राची हास्यजत्रा हा सोनी वाहिनीवरील मराठी कोमेडी शो लवकरच बंद होण्याची शक्यता आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

महाराष्ट्राची हास्यजत्रा (maharashtrachi hasya jatra)हा सोनी वाहिनीवरील (Sony Tv)मराठी कोमेडी शो लवकरच बंद होण्याची शक्यता आहे. अत्यंत विनोदी कलाकारांसोबत महाराष्ट्राला खळखळून हसविणारा हा कामेडी शो लवकरच बंद होण्याची माहिती सोनी मराठीचे कंटेट हेड अमित फाळके यांनी दिली आहे. इंस्टाग्रामवर फोटे शेअर करत त्यांनी या बाबत माहिती दिली आहे.

महाराष्ट्राची हास्यजत्रा ह्या कार्यक्रमाची सुरूवात २०१८ पासून झाली. प्रेक्षकांच्या मनोरंजनापासून ते राजकीय नेत्यांपासून तसेच युट्युब स्टारपर्यंत सर्वांना महाराष्ट्राची हास्यजत्रा या मालिकेचे वेड लावले होते. ही मालिका अनेक हिंदी भाषिक प्रेक्षकांनमध्येसुद्धा लोकप्रिय झाली होती.

या कार्यक्रमात प्रसाद खांडेकर, विशाखा सुभेदार, नम्रता आवटे तसेच समीर चौगुले असे मोठमोठे विनोदी कलाकार आहेत. तसेत कार्यक्रमाचे परिक्षण प्रसाद ओक आणि सई ताम्हणकर करतात. प्राजक्ता माळी या कार्यक्रमाची निवेदिका आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com