Good News : 41 वर्षीय अभिनेत्री पुन्हा होणार आई; व्हिडिओ शेअर करत दाखवला तो बेबी बंप
बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये विविध भूमिका साकारणारी अभिनेत्री गौहर खान सध्या खासगी कारणामुळे चर्चेत आहे. तिच्या घरी परत चिमकुली पाऊले धावणार आहे. लग्नाच्या 5 वर्षांनंतर गौहर पुन्हा एकदा आई होणार आहे.
बिग बॉसच्या सातव्या सीझनची विजेती गौरह खान आता दुसऱ्यांदा आई होणार आहे. सोशल मीडियावर एक खास व्हिडिओ शेअर करत गौहर ही गुडन्यूज दिली. गौहर आणि जैद दरबार यांना पहिला एक मुलगा आहे. आता दुसऱ्यांदा दोघेही आई-बाबा होणार आहेत.
गौरहनं तिची गुडन्यूज एकदम हटके पद्धतीने दिली आहे. व्हिडिओमध्ये ती एका गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. त्यामध्ये गौहर खान बेबी बंप फ्लॉंट करताना दिसतेय. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये 'बिस्मिल्लाह!' असं लिहिलं आहे. आशीर्वाद आणि तुमच्या प्रेमाची गरज आहे. 'गाजा बेबी २' असं ही तिनं पोस्टमध्ये म्हटलंय आहे. चाहत्यांना गोड बातमी दिल्यानंतर त्या व्हिडिओला लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.