Gautami Deshpande: अभिनेत्री होण्याआधी गौतमी देशपांडे करायची हे काम; म्हणाली, 'पाच वर्षांपूर्वी...'

Gautami Deshpande: अभिनेत्री होण्याआधी गौतमी देशपांडे करायची हे काम; म्हणाली, 'पाच वर्षांपूर्वी...'

नुकतीच गौतमी देशपांडे तिच्या जुन्या ऑफिसमधील आपल्या सहकाऱ्यांना भेटली होती. गौतमीने तिच्या जुन्या ऑफिसमधील काही फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहे.
Published by :
Team Lokshahi

झी मराठीमधील लोकप्रिय मालिका 'माझा होशील ना' कमी वेळातच लोकप्रिय झाली होती. या मालिकेला प्रेक्षकांची पसंती जास्त प्रमाणात मिळाली होती. या मालिकेत अभिनेत्री गौतमी देशपांडे आणि विराजस कुलकर्णी मुख्य भूमिकेत झळकले होते. २५ डिसेंबर रोजी गौतमीने क्रिकेटर स्वानंद तेंडुलकरसोबत लग्न केलं आहे. दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

नुकतेच गौतमी देशपांडेने काही फोटो शेअर केले आहेत. इंजिनीअरिंग क्षेत्रात शिक्षण पूर्ण केल्यामुळे गौतमीने जवळपास ४ वर्षे एका कॉर्पोरेट कंपनीमध्ये नोकरी केली होती. गौतमीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर तिचे जुनं ऑफिस, ऑफिसमधील आपले डेस्क, इत्यादींची खास झलक दाखवली आहे. गौतमी सगळ्या फोटोंमध्ये तिच्या जुन्या ऑफिसमधील आपल्या सहकाऱ्यांबरोबर असल्याचं पाहायला मिळत आहे.

gautamideshpandeofficial
gautamideshpandeofficial

गौतमी देशपांडेने 'सारे तुझ्याचसाठी' या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होते. सध्या गौतमी विराजस कुलकर्णीबरोबर ‘गालिब’ या नाटकात प्रमुख भूमिका साकारत आहे. गौतमी देशपांडे प्रसिद्ध अभिनेत्री मृण्मयी देशपांडेची बहीण आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com