अभिनेत्री गौतमी देशपांडेला कोरोना

अभिनेत्री गौतमी देशपांडेला कोरोना

Published by :
Published on

टिव्ही मालिकांतील प्रसिद्ध चेहरा अभिनेत्री गौतमी देशपांडेला कोरोनाची लागण झाली आहे. तिने याबाबतची माहिती इस्टाग्रामवरून दिली आहे.

गौतमी देशपांडे आपल्या इस्टाग्राम पोस्ट मध्ये म्हटल की,कोरोना प्रतिबंधक लशीचे दोन डोस घेतल्यानंतरही मला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कोरोनाला हलक्यात घेऊ नका. हा काळ कठीण आहे. त्यामुळे घराबाहेर पडू नका. घरी रहा, सुरक्षित रहा असे आवाहन तिने केले.

तसेच गौतमी पुढे म्हणते, 'लस घ्या. मला मान्य आहे की लस घेऊनही कोरोनाही लागण होतेय. पण लस घेतलेल्यांना कोरोनाचा त्रास कमी जाणवतोय. त्यामुळे लवकरात लवकर लस घ्या. स्वत:ची आणि कुटुंबियांची काळजी घ्या. घरी रहा सुरक्षित रहा असेही तिने आवाहन चाहत्यांना केले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com