गौतमीने भेटावं 'पप्पा' म्हणून हाक मारावी; वडिलांच्या इच्छेवर गौतमी पाटील म्हणते....
लावणी डान्सर गौतमी पाटीलने अख्ख्या महाराष्ट्राच्या तरुणाईला वेड लावले आहे. गौतमी पाटील अनेकदा वादामुळेच जास्त चर्चेत असते. गौतमी पाटील हिने पाटील आडनाव लावू नये यावरून काही संस्थांनी तिला विरोध दर्शवला होता. त्यावर विविध प्रतिक्रियाही उमटल्या होत्या. यानंतर तिच्या वडिलांची प्रतिक्रियाही समोर आली होती. यावेळी गौतमीने मला येऊ भेटावं, तिने मला पप्पा म्हणून हाक मारावी, अशी इच्छाही व्यक्त केली होती. यावर पहिल्यांदाच गौतमीने उत्तर दिले आहे.
गौतमीचे वडील रविंद्र पाटील नेरपगारे हे जळगावमधील चोपडा येथे वास्तव्यास आहेत. गौतमी जेव्हा आईच्या पोटात होती तेव्हाच तिची आई वडिलांना सोडून माहेरी राहायला गेली होती. आई, मामा आणि आजोबांनीच तिचे संगोपन केले.
त्यामुळे आपले वडील कोण हे तिला ठाऊकच नव्हते. मात्र आठवी इयत्तेत शिकत असताना मामांनी गौतमीच्या आईला आणि वडिलांना पुन्हा एकत्र संसार थाटण्यास सहकार्य केले. तेव्हा गौतमीने तिच्या वडिलांना पहिल्यांदा पाहिले होते. पण अवघ्या वर्षभरातच व्यसनाच्या आहारी गेल्याने वडिलांपासून त्यांना पुन्हा वेगळे केले. त्यानंतर गौतमीची आणि वडिलांची भेट झाली नाही.
गौतमीच्या वडिलांनी काही दिवसांपूर्वीच गावी घर बांधले आहे. या घरात मी एकटाच राहतो. गौतमीने मला येऊन भेटावं, तिने मला पप्पा म्हणून हाक मारावी, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. तर, पाटील आडनावं लावावे की नाही याबद्दल विचारले असता गौतमीचे वडील रविंद्र पाटील नेरपगारे म्हणाले, गौतमीने पाटील आडनाव लावावं , तीने चांगलं काम करावं असेही त्यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, वडिलांच्या भेटीच्या इच्छेनंतर गौतमीनी प्रतिक्रिया दिली. मी इथपर्यंत कशी आले याचा प्रवास तुम्हाला मी सांगितलेला आहे. मी याबाबत एकट्याने निर्णय घेणारी मुलगी नाहीये, माझ्या पाठी आई आहे त्यामुळे मी यावर काहीच बोलू शकणार नाही. हा घरगूती वाद असल्यामुळे मी इथे यावर बोलणार नाही, असे तिने म्हंटले आहे.