गौतमी पाटीलला ओळखत नाही असा माणूस महाराष्ट्रात तरी सापडणं कठीण आहे. कारण लहानांपासून तर साठीला टेकलेल्या म्हाताऱ्यानं सुद्धा गौतमीचा डान्स पाहिलाय. सुरुवातीला आक्षेपार्ह डान्समुळं ती चर्चेत आली. त्यानंतर तिला संपूर्ण महाराष्ट्रात ओळख मिळाली. गौतमीचा फॅन फॉलोवर्सही तसाच वाढला आहे. गौतमी पाटील आता मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. 'घुंगरु' या चित्रपटातून गौतमी सिनेसृष्टीत पाऊल ठेवणार आहे. या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे.
गौतमीच्या या चित्रपटाची निर्मिती चिंतामणी सिने क्रिएशन्स प्रस्तुत बाबा गायकवाड आणि अजित केंद्रे यांनी केली आहे. तर संदीप डांगे यांनी दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. या टिझरमधून चित्रपटाची कथा ही लावणी कलावंताच्या जीवनावर आधारित असून यात गौतमी पाटीलचा डान्स पाहायला मिळणार आहे.
तसेच, यात राजकारण, अॅक्शन सीन्स देखील पाहायला मिळणार आहेत. यामध्ये काही नवीन कलाकारांसर अभिनेत्री उषा चव्हाण यादेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. दरम्यान, या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
दरम्यान, काही दिवसांपुर्वीच गौतमी पाटील एका पंजाबी म्युझिक अल्बममध्ये झळकली होती. ‘तेरा पता’ या पंजाबी गाण्यात ती दिसली होती. यानंतर आता गौतमी मराठी सिनेसृष्टीत आपले नशीब आजमावणार आहे.