'Gulabi Sadi' in Pakistan : 'गुलाबी साडी' गाण्याची पाकिस्तानमध्ये सुद्धा क्रेझ, व्हिडीओ होतोय व्हायरल

'Gulabi Sadi' in Pakistan : 'गुलाबी साडी' गाण्याची पाकिस्तानमध्ये सुद्धा क्रेझ, व्हिडीओ होतोय व्हायरल

आता 'गुलाबी साडी' गाणं पाकिस्तानमध्ये चांगलंच गाजलं आहे.
Published by :
Sakshi Patil

रिल्स स्क्रोल करताना तुम्हालासुध्दा हे गाणं आजकाल सारखं ऐकू येत असेल? सोशल मीडियावर मागील काही दिवसांपासून 'गुलाबी साडी' या गाण्याची चांगलीच क्रेझ आहे. संजू राठोड आणि प्राजक्ता घाग यांचं ‘गुलाबी साडी’ हे गाणं तुफान व्हायरल होत आहे. इन्स्टाग्राम, यूट्यूब अशा सोशल मीडिया प्लेटफॉर्मवर या गाण्यावर मोठ्या प्रमाणावर लोकं रील्स तयार करत आहेत. या गाण्यावर फक्त मराठीच नाहीतर बॉलिवूडमधील सेलिब्रिटी सुद्धा थिरकत आहेत. गुलाबी साडी या गाण्याची क्रेझ पाकिस्तानमध्येही दिसून येत आहे. पाकिस्तानमधील या गाण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

गुलाबी साडी या गाण्यावर टांझानियाच्या किली पॉलच्या व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. त्याने चक्क ‘गुलाबी साडी’ हे मराठी गाणं गायलं आहे आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. याआधी किली पॉलने अनेक मराठी गाण्यावर रील्स केल्या, ज्या तुफान व्हायरल झाल्या. पण ‘गुलाबी साडी’ रिलमधलं किलीचं मराठी ऐकून नेटकरी थक्क झाले आहे. याशिवाय या गाण्यावर अभिनेत्री माधुरी दीक्षितलाही डान्स केल्याशिवाय राहवलं नाही. रेमो डीसूजा, सायली संजीव, ईशा केसकर यांच्यासारख्या अनेक कलाकारांनी या गाण्यावर रिल्स केल्या आहेत. पण आता हे गाणं पाकिस्तानमध्ये चांगलंच गाजलं आहे. या गाण्यावर जोडपं थिरकले आहेत.

पाकिस्तानमध्ये 'गुलाबी साडी' या गाण्यावर थिरकणारा तरुण हा मराठी असल्याचे सांगण्यात येत आहे. अमर प्रकाश या मराठी तरुणाने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर गुलाबी साडी या गाण्यावर थिरकतानाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या गाण्यावर अमर आणि त्याची पत्नी थिरकताना दिसत आहे. त्याने, “जेव्हा तुम्ही पाकिस्तानमधील मराठमोळ्या लग्नसमारंभात ‘गुलाबी साडी’ या गाण्यावर डान्स करता…”, असं कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर संजू राठोडनेही कमेंट करत खूपच छान अशी प्रतिक्रिया दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com