Happy Birthday Neetu Kapoor: अभिनेत्री नीतू कपूर यांचा आज वाढदिवस

Happy Birthday Neetu Kapoor: अभिनेत्री नीतू कपूर यांचा आज वाढदिवस

Published by :
Published on

बॉलिवूडच्या अभिनेत्री नीतू कपूर यांचा आज वाढदिवस आहे. ८ जुलै १९५८ साली दिल्लीमध्ये नीतू यांचा जन्म झाला. नीतू यांचं खरं नाव हरमीत कौर असं आहे. नीतू कपूर यांनी बालकलाकार म्हणून हिंदी सिनेसृष्टीत अभिनयाला सुरुवात केली होती. नीतू कपूर यांनी त्यांच्या अभिनयाने अनेकांची मनं जिकंली होती. मुख्य अभिनेत्री म्हणून नीतू कपूर यांनी 'रिक्शेवाला' या सिनेमातून प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले . नीतू कपूर १४ वर्षांच्या असताना त्यांनी ऋषी कपूर यांच्यासोबत सिनेमामध्ये एकत्र काम केलं होतं. इथूनच त्यांची मैत्री झाली आणि पुढे याच मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com