‘वच्छी आत्या’ने भावनिक पोस्ट करत लेकीला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा…
झी मराठी वाहिनीवरील नांदा सौख्य भरे या मालिकेतून वच्छी आत्या भूमिकेद्वारे प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेल्या मराठमोळ्या अभिनेत्री वर्षा दांदळे या गेल्या काही महिन्यापासून अंथरुणाला खिळल्या होत्या. आता कुठे त्यांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान आज वर्षा दांदळे यांच्या लेकीचा वाढदिवस आहे, यानिमित्त वर्षा दांदळे यांनी अपघातग्रस्त असताना लेकीने घेतलेल्या तब्येतीच्या काळजीची आठवण काढत दिल्या शुभेच्छा दिल्य़ा.
गेल्या महिन्यात 22 सप्टेंबर रोजी भंडारदरा येथून मुंबईला परत येत असताना अभिनेत्री वर्षा दांदळे यांच्या गाडीला अपघात झाला. अपघातामुळे त्यांच्या पाठीच्या मणक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली होती. याखेरीज त्यांच्या उजव्या पायाला देखील भयंकर मार लागला होता. तसेच त्यांच्या चेहऱ्यावर देखील मार लागल्याच्या खुणा होत्या. अपघात झाल्यापासून अंथरुणावरच आहेत.
दरम्यान आज वर्षा दांदळे यांच्या लेकीचा वाढदिवस आहे. यानिमित्तच त्यांनी लेकीसाठी एक भावनिक अशी पोस्ट लिहिली आहे. आपल्या लाडक्या लेकीसोबतचा एक फोटो देखील शेअर केला आहे. यावेळी त्यांनी आपल्या आजारपणाची माहिती मीडियावरून दिली. तसेच लेकीने अपघातग्रस्त काळात घेतलेल्या काळजीचीही आठवण सांगितली.
मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
ही बातमी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पोहोचली असता त्यांनी या बातमीची दखल घेऊन महापौर किशोरी पेडणेकर यांना नाशिकला पाठवले वर्षा दांदळे यांच्या तब्येतीची चौकशी करण्यास तसेच सर्वतोपरी मदत करण्याचेही आश्वासन दिले आहे. या अपघातानंतर अंथरुणाला खिळून असल्याने हालचाल करणे शक्य नव्हते. आज जवळपास एक महिन्यानंतर त्यांच्या तब्येतीत काहीशी सुधारणा होताना दिसत आहे.आपल्यावर डॉक्टर उपचार करत असल्याची माहिती वर्षा यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या चाहत्यांना दिली.