झी मराठी विरोधात स्वराज्य संघटना आक्रमक; हर हर महादेव' दाखवू नका.. अखेरचा इशारा!

झी मराठी विरोधात स्वराज्य संघटना आक्रमक; हर हर महादेव' दाखवू नका.. अखेरचा इशारा!

हर हर महादेव हा वादग्रस्त चित्रपट झी मराठी वाहिनीच्या माध्यमातून १८ डिसेंबर रोजी टीव्हीवर प्रदर्शित केला जाणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

अमोल धर्माधिकारी, पुणे

हर हर महादेव हा वादग्रस्त चित्रपट झी मराठी वाहिनीच्या माध्यमातून १८ डिसेंबर रोजी टीव्हीवर प्रदर्शित केला जाणार आहे. या चित्रपटास छत्रपती संभाजीराजे व स्वराज्य संघटनेसह राज्यभरात अनेक स्तरांतून विरोध झाला होता. त्यामुळे हा वादग्रस्त चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित करू नये, असे पत्र छत्रपती संभाजीराजे यांनी झी स्टुडिओच्या व्यवस्थापनास दिलेले होते. मात्र अजूनही झी मराठी वाहिनीवर हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार असल्याची जाहिरात दाखविली जात आहे.

या पार्श्वभूमीवर आज स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी श्री विनोद साबळे व श्री अंकुश कदम यांनी झी स्टुडीओ मध्ये प्रत्यक्ष जाऊन व्यवस्थापनास इशारा दिलेला आहे. हर हर महादेव ह चित्रपट प्रदर्शित करणार नसल्याची लेखी हमी त्यांनी मागितली असून, छत्रपती संभाजीराजे यांचे पत्र व समस्त शिवभक्तांच्या भावनेकडे दुर्लक्ष करून चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित केल्यास होणाऱ्या गंभीर परिणामांना व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास, त्यास झी स्टुडीओ व्यवस्थापन जबाबदार असेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com