क्रिकेटर हरभजन सिंहच्या ‘फ्रेंडशिप’ चित्रपटाचे टीझर लाँच

क्रिकेटर हरभजन सिंहच्या ‘फ्रेंडशिप’ चित्रपटाचे टीझर लाँच

Published by :
Published on

भारतीय क्रिकेट टीमचा दिग्गज क्रिकेटर हरभजन सिंहने त्याचा या आगामी तमिळ चित्रपटाचे टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. या चित्रपटाचे नाव 'फ्रेंडशिप' असून हरभजन टीझरमध्ये जबरदस्त लूकमध्ये जबरदस्त एंट्री मारताना दिसत आहे.

हरभजनने ट्विटर अकाऊंटवर 'फ्रेंडशिप' चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. हा टीझर शेअर करत लिहिले आहे की, 'शार्प, क्रिस्प, इंटेन्स.. माझा आगामी चित्रपट फ्रेंडशिपचा टीझर प्रदर्शित' या चित्रपटाचा टीझर तीन भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. असे कॅप्शन देण्यात आले आहे.

तमिळ, तेलुगू आणि हिंदी 'फ्रेंडशिप' या चित्रपटाचे दिग्दर्शन पॉल राज आणि सूर्या करत आहेत. यामध्ये अर्जुन आणि तमिळ 'बिग बॉस' फेम अभिनेत्री लोसलिया मारियानेसन ही अभिनेत्री दिसणार आहे. हरभजन यापूर्वी सलमान खान, प्रियांका चोप्रा आणि अक्षय कुमारचा चित्रपट मुझसे शादी करोगी या चित्रपटात दिसला होता

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com