Huma Qureshi Brother
Huma Qureshi Brother

Huma Qureshi Brother : पार्किंगच्या वादातून बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीच्या चुलत भावाची हत्या

दिल्लीतील निजामुद्दीनमधील जंगपुरा भोगल लेन येथे गुरुवारी रात्री पार्किंगवरून झालेल्या वाद झाला
Published by :
Team Lokshahi
Published on

(Huma Qureshi Brother) दिल्लीतील निजामुद्दीनमधील जंगपुरा भोगल लेन येथे गुरुवारी रात्री पार्किंगवरून झालेल्या वादातून एका तरुणाची हत्या झाल्याची घटना घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, मृताचे नाव आसिफ कुरेशी असून तो बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीचा चुलत भाऊ आहे.

घटनेची वेळ गुरुवारी रात्री सुमारे 11 वाजताची आहे. आसिफ कामावरून घरी परतल्यावर त्याने घराच्या मुख्य गेटसमोर उभी असलेली शेजाऱ्याची दुचाकी हटवण्यास सांगितले. यावरून त्याचा दोन जणांशी वाद झाला. वाद वाढत जाऊन आरोपींनी त्याच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

आसिफची पत्नी सायनाज कुरेशी हिने पोलिसांना दिलेल्या माहितीमध्ये सांगितले की, यापूर्वीही आरोपींनी पार्किंगच्या कारणावरून वाद घातला होता. तिने आरोप केला की क्षुल्लक कारणावरून पतीवर अमानुषपणे हल्ला करण्यात आला.

या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून, गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com