siddharth jadhav
siddharth jadhav

Siddharth Jadhav: लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला सिद्धार्थ जाधवचा हुप्पा हुय्या २

सिद्धार्थ जाधवचा हुप्पा हुय्या २ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार, पहिल्या भागातील हनम्याची जादूची कहाणी पुढे कशी वाढणार हे पाहणे रोचक ठरणार.
Published by :
Team Lokshahi
Published on

सिद्धार्थ जाधव हा नेहमीच कोणत्यांना कोणत्या गोष्टीवरुन चर्चेत राहिला. सिध्दार्थ जाधव हा सामन्य कुटुंबापासून ते सुपरस्टार पर्यतचा प्रवास खडतर राहिला. डीडी सह्याद्री वाहिनीच्या एक शून्य बाबुराव या मालिकेपासून त्यांने अभिनयाला सुरुवात केली नंतर त्याने खूप चांगले चित्रपट केले. 2006 मध्ये त्यांने रोहित शेट्टी यांच्या गोलमाल आणि फन अनलिमिटेड या चित्रपटातून सत्तू सुपारी म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. विनोदी मालिका करायलाही सुरुवात केली.

26 मार्च 2010 मध्ये आलेल्या हुप्पा हुय्या हा चित्रपट प्रक्षेकांच्या भेटीस आला. त्या चित्रपटामध्ये सिद्धार्थ जाधव मुख्य भूमिकेत दिसला. त्या चित्रपटामध्ये हनम्या नावाच्या भूमिकेत दिसत आहे. जो गरीब आणि हनुमानाच्या भक्त आहे. सर्वांना मदत करणारा आणि अन्यायाविरुद्ध लढणारा असा हा हनम्या. एका वृद्ध महिला अक्काला जंगलातून वनौषधी गोळा करताना हनम्या वानरांशी संवाद साधतो आणि त्यातील एक फळ खाल्ले आणि त्याला जादूची शक्ती मिळाली आहे. जी देवाची देणगी आणि ती केवळ ११ वेळा वापरली जाऊ शकतो असा हा चित्रपट होता.

सिद्धार्थ जाधव यांने आपल्या सोशल मिडीयावर पोस्ट करत हुप्पा हुय्या २ येणार असल्याचे सांगितले. त्या पोस्टवर चाहत्यांनी भरभरुन कमेंट्स केल्या आहेत. नुसताच चाहता वर्ग नाहीतर कलाकारांनी कमेंट्स करत चित्रपटाची उत्सुकता असल्याचे सांगितले आहे.

या चित्रपटाचे अमर कक्क, पुष्पा कक्कड, समित कक्कड निर्माते आहेत तर हा चित्रपट हृषिकेश कोळी समित कक्कड यांनी लिहिले. समित कक्कड यांचा हा चित्रपट आहे. मुख्य भूमिकेत सिद्धार्थ जाधव असल्याने चित्रपटामध्ये नेमकी काय गंमत आहे हे पाहणं औत्सुकतेच ठरणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com