Indian Idol
Indian Idolteam lokshahi

Indian Idol: इंडियन आयडॉलमध्ये सहभागी व्हायचे? मग ही बातमी नक्की वाचा

Indian Idol Audition:मुंबईमध्ये इंडियन आयडॉलचे ऑडिशन कधी आणि कुठे आहे हे जाणून घ्या सविस्तर...
Published by  :
Team Lokshahi

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो म्हणजे इंडियन आयडॉल. या शोच्या मंचावर अनेकांना आपल्या सुरेल आवाजाने स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण करण्याची संधी दिली आहे. ‘इंडियन आयडॉल ’ या शोमुळे अनेकांचे संपूर्ण आयुष्य बदलले आहे. आता ‘इंडियन आयडॉल मराठी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तुम्हाला या शोमध्ये सहभागी होण्याची इच्छा असेल तर ही बातमी नक्की वाचा...

उभरत्या गायकांना त्यांची कला सादर करण्यासाठी राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी निर्मात्यांनी मुंबई शहरात ऑडिशन ठेवल्या आहेत. ह्या ऑडिशन २७ ऑगस्ट २०२३ रोजी नाहर इंटरनॅशनल स्कूल, नाहर्स अमृतशक्ती, चांदिवली फार्म रोड, ऑफ साकीनाका रोड, अंधेरी पूर्व येथे आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे इच्छुक स्पर्धकांना सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

‘इंडियन आयडॉल ’ची आत्तापर्यंत अनेक पर्व झाली आहेत. ज्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे आणि त्यातून देशाला अनेक गायकही मिळाले आहेत. आता ‘इंडियन आयडॉल – मराठी’ या कार्यक्रमामुळे महाराष्ट्रातला आवाज घराघरांत पोहोचणार आहे आणि आपली कला सादर करण्यासाठी स्पर्धकांना हक्काचा मंच मिळणार आहे. सोनी मराठी वाहिनीच्या प्रेक्षकांना ‘इंडियन आयडॉल – मराठी’ लवकरच पाहायला मिळणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com