विवेक ओबेरॉयची ‘इनसाईड एज 3’ सीरिज येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

विवेक ओबेरॉयची ‘इनसाईड एज 3’ सीरिज येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

Published by :

इनसाईड एज' ही वेबसीरिज चाहत्यांच्या लक्षात राहणारी ठरली आहे. ॲमेझॉन प्राईमवर आलेल्या या वेब सीरिजने सर्वांची वाहवा मिळवली होती.मॅच फिक्सिंगभोवती कथा फिरणाऱ्या या वेबसीरिजचे पहिले दोन्ही सीझन चांगलेच गाजले होते. आता 'इनसाईड एज'चा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ॲमेझॉन प्राईमने या वेबसीरिजच्या तिसऱ्या सीझनच्या प्रीमियरची तारीख जाहीर केली आहे.

यामध्ये विवेक ओबेरॉय आणि रिचा चढ्ढा यांच्या प्रमुख भूमिका आहेत 'इनसाईड एज सीझन ३' चा प्रीमिअर ३ डिसेंबरला जागतिक स्तरावर २४० हून अधिक देश आणि प्रदेशांमध्ये होईल.करण अंशुमन हे या सीरिजचे निर्माते असून कनिष्क वर्मा यांनी दिग्दर्शन केले आहे. या वेब सीरिजमध्ये विवेक ओबेरॉय आणि रिचा चढ्ढा यांच्यासोबत तनुज विरवानी, सयानी गुप्ता, आमिर बशीर, अमित सियाल, सपना पब्बी यांच्यासह इतर कलाकार दिसणार आहेत. मुंबई मॅवरिक्स नावाच्या एका क्रिकेट टीमच्या भोवती इनसाईड एज'ची कहाणी फिरते, हे तुम्ही पहिल्या दोन्ही सीझन्समध्ये पाहिलं असेल. त्यामुळे या वेबसीरिजच्या तिसऱ्या सिजनमध्ये नेमकं काय असणार, याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com