Lokशाही मराठीचा इम्पॅक्ट; इफ्फी महोत्सवात तीन मराठी चित्रपटांची निवड

Lokशाही मराठीचा इम्पॅक्ट; इफ्फी महोत्सवात तीन मराठी चित्रपटांची निवड

गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात महाराष्ट्र शासनाकडून तीन मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

लोकशाही मराठी न्यूज चॅनेलचा इम्पॅक्ट पाहायला मिळत आहे. लोकशाही मराठीने याच्या आधी ही बातमी दाखवली होती की, इफ्फी महोत्सवात गेल्यावर्षी एकाही मराठी चित्रपटाला स्थान मिळाले नव्हते. ही बातमी एकमेव मराठी न्यूज चॅनेल लोकशाही मराठीने दाखवली होती. या बातमीवर अनेक मराठी कलाकारांनी देखिल प्रतिक्रिया दिली होती. लोकशाही मराठीने दाखवलेल्या बातमीनंतर आता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात महाराष्ट्र शासनाकडून तीन मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. गोवा आतंरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'फिल्म बाजार ' या गटात दरवर्षी मराठी चित्रपट महाराष्ट्र शासनाकडून पाठवले जातात. महाराष्ट्र सरकारकडून तीन मराठी सिनेमांची निवड करण्यात आली असून याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा भारतातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव असतो. 'ग्लोबल आडगाव', 'गिरकी' आणि 'बटरफ्लाय' या तीन मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. या चित्रपटांची निवड करण्याकरता पाच सदस्यांची तज्ज्ञ समिती नेमण्यात आली होती.

शासनाने महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या माध्यमातून जाहिरातीद्वारे गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील 'फिल्म बाजार' या विभागात राज्य सरकारकडून पाठविण्याकरता इच्छुक चित्रपटांचे प्रवेश मागविले होते. दरवर्षी गोवा आतंरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'फिल्म बाजार ' या गटात मराठी चित्रपट महाराष्ट्र शासनाकडून पाठवले जातात.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com