Jacqueline FernandezTeam Lokshahi
मनोरंजन
Jacqueline Fernandez: मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसला दिलासा, कोर्टातून जामीन
200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला मोठा दिलासा मिळाला आहे
200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला मोठा दिलासा मिळाला आहे. पटियाला हाऊस कोर्टाने मंगळवारी अभिनेत्रीला 2 लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि तेवढ्याच रकमेच्या जामीनावर जामीन मंजूर केला. 10 नोव्हेंबर रोजी कोर्टात जॅकलिनच्या जामिनावर युक्तिवाद झाल्यानंतर निर्णय राखून ठेवण्यात आला होता. त्याचबरोबर आता अभिनेत्रीला सशर्त जामीन देण्यात आला आहे. या प्रकरणात अभिनेत्री अंतरिम जामिनावर सुटली होती.