Jasmine Bhasin: डोळ्यांना लेन्स लावणं पडलं महागात, जास्मिन भसीनच्या डोळ्यांना झाली दुखापत

Jasmine Bhasin: डोळ्यांना लेन्स लावणं पडलं महागात, जास्मिन भसीनच्या डोळ्यांना झाली दुखापत

नुकतीच जास्मिनबद्दल एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. जास्मिनच्या डोळ्यांना दुखापत झाल्याची बातमी समोर आली आहे. डोळ्यांना लेन्स लावणं जास्मिनला महागात पडलं आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री जास्मिन भसीन ही मुख्यत: मालिकांमधून ओळखली जाते. जास्मिन हिने 'बिग बॉस' आणि 'खतरों के खिलाडी' या टीव्ही शोद्वारे आपली ओळख चाहत्यांमध्ये निर्माण केली. 'टशन-ए-इश्क', 'दिल से दिल तक', 'नागिन', या मालिकांमध्ये जास्मिनने काम केले आहे. यामुळे जास्मिनचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. अभिनयासोबतच जास्मिन एक उत्तम मॉडल देखील आहे. नुकतीच जास्मिनबद्दल एक चिंताजनक बातमी समोर आली आहे.

जास्मिनच्या डोळ्यांना दुखापत झाल्याची बातमी समोर आली आहे. डोळ्यांना लेन्स लावणं जास्मिनला महागात पडलं आहे. लेन्स लावल्यामुळे जास्मिनला आधी डोळ्यांना त्रास जाणवू लागला आणि थोड्या वेळाने तिला डोळ्यांनी दिसणं बंद झाल आहे. दिल्लीला एका कार्यक्रमादरम्यान जास्मिनने डोळ्यांना लेन्स लावले होते यानंतर तिच्या डोळ्यांना जळजळ जाणवू लागली, पण तिने कार्यक्रम पूर्ण केले. कार्यक्रमातून निघाल्यावर जास्मिन मुंबईत परतली आणि डॉक्टरांकडे उपचारासाठी गेली.

उपचारादरम्यान डॉक्टरांनी सांगितले तिच्या डोळ्यांमधील कार्नियाला दुखापत झाली आहे. या दुखापतीवर सध्या डॉक्टरांनी जास्मिनच्या डोळ्यांवर उपचार म्हणून पट्टी बांधली आहे. दुखापतीमुळे डोळे दुखत असल्याने झोपही येत नसल्याचं जास्मिनने सांगितले आहे. तरी ही दुखापत पुर्णपणे बरी होण्यासाठी ४-५ दिवसांचा कालावधी लागणार असल्याचं डॉक्टरांनी सांगितले आहे. मात्र डोळे हे नाजूक अवयव असल्यामुळे जास्मिनला तिची फार काळजी घ्यावी लागणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com