जावेद अख्तर यांना लंडनच्या विद्यापीठाकडून मानद पदवी बहाल
Admin

जावेद अख्तर यांना लंडनच्या विद्यापीठाकडून मानद पदवी बहाल

जावेद अख्तर यांना लंडनच्या विद्यापिठाकडून मानद पदवी बहाल करण्यात आली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

जावेद अख्तर यांना लंडनच्या विद्यापिठाकडून मानद पदवी बहाल करण्यात आली आहे. लंडनच्या SOAS विद्यापीठाच्या एका समारंभामध्ये जावेद अख्तर यांना डॉक्टर ऑफ लिटरेचर म्हणून सन्मानित करण्यात येणार आहे.

कवी, गीतकार, पटकथा लेखक या क्षेत्रांमधील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल जावेद अख्तर यांना मानद डॉक्टरेट ही पदवी प्रदान करण्यात येणार आहे. अशी लंडनच्या SOAS विद्यापीठाच्या निवेदनात म्हटले आहे. सप्टेंबरमध्ये 5, 6 किंवा 7 तारखेला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

याच्याआधी सुद्धा जावेद अख्तर यांना पद्मभूषण, साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आला आहे. जावेद अख्तर हे विविध विषयांवर आपली परखड मतं मांडत असतात.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com