‘जय भीम’ चित्रपट पाहिल्यानंतर जितेंद्र आव्हाडांच ट्विट

‘जय भीम’ चित्रपट पाहिल्यानंतर जितेंद्र आव्हाडांच ट्विट

Published by :

तामिळचा सुपरस्टार सूर्या शिवकुमार याचा 'जय भीम' सिनेमा अमेझॉनवर प्रदर्शित झाला चित्रपट सध्या देशभरातून सर्वसामान्यांपासून सेलिब्रेटींपर्यंत अनेकजण यावर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. भारतातील १९९६ मधील एका विशिष्ट आदिवासी समुहावर आधारित घटनेवर हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीला उतरला आहे. तसेच राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा या सिनेमावर ट्विट करतानाच पाहायला मिळालं.

दरम्यान 'जय भीम' चित्रपट पाहिल्यानंतर " मी मनापासून अस्वस्थ झालो हा चित्रपट पाहून प्रश्न एकाच पडला , डॉ. बाबासाहेब आंबेडकर नसते तर, मला आठवत नाही कि मी माझ्या भाषणाच्या शेवटी जय भीम कधी म्हणायला लागलो. ही घोषणा एका जातीशी संबंधीत नसून ते एक उर्जास्त्रोत आहे. जे तुम्हांला अन्यायाविरुद्ध, स्वाभीमानासाठी, स्वत्वासाठी उभे राहायला मदत करते, ताकद देते. आजही आपण पूर्णपणे जातीभेदाच्या चक्रव्यूहातून बाहेर पडलेलो नाही." अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटर वर दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com