शुटींग दरम्यान स्टंटबाजीत जॉन अब्राहम जखमी

शुटींग दरम्यान स्टंटबाजीत जॉन अब्राहम जखमी

Published by :
Published on

लोकशाही न्यूज नेटवर्क

बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम एक नवा चित्रपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. 'अटॅक' असं या आगामी चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटाच्या शुटींग दरम्यान दुखापत होऊन जॉन अब्राहम जखमी झाला आहे.

जॉन एक फाईटिंग सिक्वेंस शूट करत होता. यावेळी एक गुंड जॉनच्या अंगावर ट्यूबलाईल फोडतो असा सीन शूट केला जाणार होता. परंतु हा सीन शूट करत असताना सहकलाकाराचा तोल गेला अन् ती ट्यूबलाईट जॉनच्या मानेवर फुटली. यातील काही काचा जॉनच्या चेहऱ्यावर देखील उडाल्या आणि रक्त वाहू लागलं. रक्त पाहून दिग्दर्शकानं त्वरित चित्रीकरण थांबवले.

जॉनने हा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला असून त्याने . "हे जे काही चाललं आहे ते मला खूप आवडतंय" अशा आशयाची कमेंट त्याने या व्हिडीओवर केली आहे. या चित्रपटात राकूल प्रित सिंह आणि जॅकलिन फर्नांडिस देखील झळकणार आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com