Kabhi Eid Kabhi Diwali
Kabhi Eid Kabhi DiwaliTeam Lokshahi

Kabhi Eid Kabhi Diwali : चित्रपटामध्ये सलमान खानसोबत दिसणार राघव जुयाल

राघव जुयाल 'कभी ईद कभी दिवाली' या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार
Published by :
Published on

बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा 'कभी ईद कभी दिवाली' हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटात सलमान खानसह पूजा हेगडे (Pooja Hegde), आयुष शर्मा (Ayush Sharma) आणि अभिनेता झहीर इक्बाल (Zaheer Iqbal) यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

डान्सर अभिनेता आणि टीव्ही शो होस्ट राघव जुयाल (Raghav Juyal) देखील या मोस्ट अवेटेड चित्रपटाचा हिस्सा असणार आहे. राघव जुयाल 'कभी ईद कभी दिवाली' या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे.

Kabhi Eid Kabhi Diwali
अक्षय कुमार 'या' सिनेमात साकारणार विमान कंपनीच्या मालकाची भूमिका

राघव जुयाल स्पेशल डान्स परफॉरमन्ससाठी नाही, तर एका भूमिकेसाठी त्याला कास्ट करण्यात आले आहे. त्याची ही भूमिका वेगळी असणार आहे. 'कभी ईद कभी दिवाली' हा विनोदी आणि 'मसाला एंटरटेनर' सिनेमा असला तरी यामध्ये राघवची कॉमेडी (Comedy) किंवा डान्स (Dance) पाहायला मिळणार नसल्याचे सूत्रांच्या आधारे समोर आले आहे.

शूटिंग कधी होणार सुरू?

सलमान खानच्या या सिनेमाचे शूटिंग लवकरच सुरू होणार आहे. त्यापूर्वीच अनेक बातम्या या मुव्हीबाबत समोर येत आहेत. साजिद नाडियाडवाला (Sajid Nadiadwala) या सिनेमाचे दिग्दर्शन करत आहे.

Kabhi Eid Kabhi Diwali
'जयेशभाई जोरदार' मधील जोरदार गाणं प्रदर्शित

महिनाभरापूर्वी फिल्मसिटीमध्ये या चित्रपटाच्या शूटिंगसाठी महागडा सेट तयार करण्यात आला असून मुंबईच्या बाहेरीलही काही भागात लोकेशन्स निश्चित करण्यात आले आहेत. या चित्रपटाचे शूटिंग 18 मे ते 31 मे दरम्यान सुरू होण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com