मनोरंजन
Chandramukhi 2: कंगना रनौतचा 'चंद्रमुखी 2' मधील पहिला लूक समोर
कंगना ही नेहमी वेगवेळ्या कारणाने तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते.
कंगना ही नेहमी वेगवेळ्या कारणाने तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने आता साऊथ सिनेसृष्टीतही पाऊल ठेवले आहे. ती अभिनेता राघव लॉरेन्ससोबत आगामी हॉरर-कॉमेडी चित्रपट 'चंद्रमुखी 2' द्वारे लोकांना हसवण्यासाठी आणि घाबरवण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटाचा पहिला भाग प्रेक्षकांमध्ये खूप गाजला होता. आता दुसऱ्या भागातून प्रत्येक पात्राचा लूक समोर येत आहे. 'चंद्रमुखी 2' मधील कंगना रनौतचा फर्स्ट लूक समोर आला आहे.
निर्मात्यांनी 'चंद्रमुखी 2' मधील कंगना रनौतचा फर्स्ट लूक रिलीज केला.