“कर भरला नाही म्हणून सरकार व्याज घेतंय” म्हणतं कंगनाचे रडगाणं सुरूच

“कर भरला नाही म्हणून सरकार व्याज घेतंय” म्हणतं कंगनाचे रडगाणं सुरूच

Published by :
Published on

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिच्यावरही आर्थिक संकट कोसळलंय. बॉलिवूडमध्ये सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून जिला ओळखलं जातं अशा कंगना रनौतने तिच्याकडे सध्या कोणतंच काम नसल्याची कबुली दिली आहे.

अभिनेत्री कंगना रनौतने गेल्या वर्षी अर्धाच कर भरला असल्याचं तीने सोशल मिडीयावर सांगितले आहे. आपली व्यथा तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर व्यक्त केली आहे. सोबतच तिने केंद्र सरकारच्या 'इच वन पे वन पॉलिसी'चा व्हिडीओ शेअर केलाय.

यावेळी तिने लिहिलं, "जरी मी सगळ्यात जास्त कर भरणारी अभिनेत्री असली तरी सध्या माझ्या हातात काही काम नाही. मी माझ्या एकूण कमाईच्या ४५ टक्के इतका कर भरत असते. पण आता काम नसल्यामुळे मी आतापर्यंत गेल्या वर्षी अर्धा कर भरलेला नाही. पैसे नसल्यामुळे मला तो भरता आला नाही. आयुष्यात पहिल्यांदाच मला कर भरण्यासाठी उशीर झालाय."
यापुढे कंगनाने लिहिलं, "सरकार माझ्या थकित करावर व्याज जोडत आहे. मात्र मी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करते. सध्याचा काळ सर्वांसाठीच कठीण आहे, मात्र आपण सर्वजण एकत्र अशा काळावर मात करुया."

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com