Kantara A Legend Chapter- 1: कांतारा अ लेजेंड चॅप्टर-1 चा फर्स्ट लूक आऊट

Kantara A Legend Chapter- 1: कांतारा अ लेजेंड चॅप्टर-1 चा फर्स्ट लूक आऊट

ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा' चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाने दमदार कमाई केली. या ब्लॉकबस्टर चित्रपटानंतर ऋषभ शेट्टीने 'कांतारा ए लीजेंड चॅप्टर 1' आणला आहे.
Published by :
Team Lokshahi

ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा' चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाने दमदार कमाई केली. या ब्लॉकबस्टर चित्रपटानंतर ऋषभ शेट्टीने 'कांतारा ए लीजेंड चॅप्टर 1' आणला आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. हा टीझर पाहून प्रेक्षकांच्या अंगावर काटा आला. पण आता प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढली आहे. या चित्रपटाची पहिली झलक इतकी जबरदस्त आहे की, चित्रपट किती कमाल याचा अंदाज प्रेक्षक लावत आहेत.

कांतारा अ लेजेंड चॅप्टर-1 या चित्रपटाचा फर्स्ट लूक ऋषभ शेट्टीनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये तो रक्ताने माखलेला दिसक आहे. त्याच्या एका हातात त्रिशुळ दिसत आहे. तसेच Hombale Films या युट्यूब चॅनलवर कांतारा अ लेजेंड चॅप्टर-1 या चित्रपटाच्या फर्स्ट लूकचा टीझर देखील शेअर करण्यात आला आहे.

'कांतारा ए लीजेंड चॅप्टर 1' असं या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटातही ऋषभ शेट्टी मुख्य भूमिकेत असेल. चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूक समोर आला आहे. पण त्याला ओळखणं देखील कठीण झाले आहे. अतिशय अप्रतिम पात्रात दिसणाऱ्या ऋषभचा लूक सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. ऋषभ शेट्टीचा लूक पाहून भीती तर वाटतेच. पण हा टीझर पाहून प्रेक्षकांच्या मनात चित्रपटाबाबतचा उत्साह वाढला आहे.

'कांतारा' हा चित्रपट एक अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. अवघ्या 16 कोटींमध्ये बनलेला ‘कांतारा’ हा चित्रपट केवळ साऊथच नव्हे तर, हिंदीमध्येही हिट ठरला. 'कांतारा' या चित्रपटात अच्युता कुमार, सप्तमी गौडा, प्रमोद शेट्टी आणि किशोर सहाय्यक भूमिकेत दिसले. तर या चित्रपटात ऋषभनं शिवा ही भूमिका साकारली. या चित्रपटातील ऋषभच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं आहे. कन्नड भाषेतील कांतारा हा चित्रपट हिंदी आणि तेलुगू या भाषांमध्ये देखील रिलीज करण्यात आला. कांतारा हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्ही पाहू शकता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com