Kartik Aaryan
Kartik AaryanTeam Lokshahi

Kartik Aaryan : चाहत्यांच्या प्रश्नांना कार्तिकचे भावनिक उत्तर....

सोशल मीडियावर कार्तिकची चर्चा सुरू....
Published by :
Published on

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) याचा 'भूल भुलैया 2' हा चित्रपट सध्या चित्रपटगृहांमध्ये चांगलाच जम बसवत आहे. हा हॉरर-कॉमेडी चित्रपट प्रेक्षकांचे प्रचंड मनोरंजन करत आहे. कमाईचा बाबतीत बोलायचं झालं तर सर्व चित्रपटांना मागे टाकत कार्तिकच्या 'भूल भुलैया 2' ने बॉक्स ऑफिसवर 150 कोटींचा गल्ला पार केला आहे. भूल भुलैया 2 नुकताच 150 कोटीच्या घरात दाखल झाला आहे. चित्रपटाने चांगला व्यवसाय केल्यानंतर कार्तिकने सोशल मीडियावर चाहत्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देखील दिली. कार्तिकने चाहत्यांसोबत ट्विटरवर 'आस्क मी एनीथिंग' हे सेशन ठेवलं होतं. एका चाहत्याने कार्तिकला प्रश्न विचारला की तुम्हाला 150 कोटींमधून किती पैसे मिळाले ? चाहत्याच्या या प्रश्नाला उत्तर देताना कार्तिकने लिहिले की 150 कोटींचा फायदा नाही तर मला आपल्यासारख्या चाहत्यांचे प्रेम मिळाले आहे. आणि यापेक्षा मोठी संख्या काय असणार असं कार्तिकने भावनिक उत्तर दिलं.

Kartik Aaryan
कार्तिक आर्यनने मॉरिशसमध्ये केला डान्स

चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची कार्तिकने उत्तरे दिली. या सत्रात त्याने चित्रपटाशी संबंधित अनेक गोष्टी बोलल्या आणि खूप मजेदार उत्तरे दिली. कार्तिकचे उत्तर चाहत्यांना खूप आवडले आणि सोशल मीडियावर देखील खूप व्हायरल होत आहे. 'भूल भुलैया 2' बद्दल बोलायचे झाले तर कार्तिकसोबत कियारा अडवाणी (Kiara Adwani), तब्बू (Tabbu), राजपाल यादव (Rajpal Yadav) आणि संजय मिश्रा (Sanjay Mishra) ही कलाकार मंडळी महत्त्वाच्या भूमिकेत दिसले आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनीस बज्मी (Anees Bajmi) यांनी केले आहे. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर कार्तिककडे सध्या चित्रपटांची ओढ आहे. अल्लू अर्जुनच्या तेलगू चित्रपटाच्या रिमेकमध्ये तो दिसणार आहे. याशिवाय तो 'फ्रेडी' (Freddy), 'कॅप्टन इंडिया'सह (Captain India) इतर काही चित्रपटांमध्ये देखील दिसणार आहे.

Kartik Aaryan
Kartik Aaryan | ‘दोस्ताना 2’ मधून कार्तिक आर्यन आऊट
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com