कार्तिक आर्यन ‘कॅप्टन इंडिया’, लवकरच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला…
कार्तिकने आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. सर्वांना उत्सुकता लागलेल्या या चित्रपटाचं नाव 'कॅप्टन इंडिया' असून प्रसिद्ध हंसल मेहता याचे दिग्दर्शन करत आहेत. कार्तिकने या फिल्मचे पोस्टर त्याच्या सोशल मिडिया अकाऊंटवर पोस्ट केले आहे. या चित्रपटाच्या कथेतून इतिहासातील सर्वात यशस्वी बचाव मोहीम मोठ्या पडद्यावर आणण्यासाठी सज्ज झाल्याचं कॅप्शन त्याने टाकलंय.
या सिनेमात कार्तिक आर्यन एका शूर आणि साहसी पायलटच्या भूमिकेत दिसणार आहे. रॉनी स्क्रुवाला आणि हरमन बावेजा यांची निर्मिती असलेला चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे.
'कॅप्टन इंडिया' हा सिनेमा खूप प्रेरणादायक असून त्याच्यासोबत मला आपल्या ऐतिहासिक वारशाचा भाग बनता आल्याची प्रतिक्रिया कार्तिकने दिली आहे. हंसल सरांच्या कामाप्रती माझ्या मनात खूप आदर आहे आणि त्यांच्यासोबत काम करण्यासाठीची ही योग्य संधी आहे, असही त्याने म्हटलंय. तर 'कॅप्टन इंडिया'चे चित्रीकरण पुढील वर्षीच्या सुरुवातीला सुरू होणार आहे.
'कॅप्टन इंडिया' सत्य घटनेपासून प्रेरित असून एका अशा घटनेला चित्रित करण्यात येणार आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती आपले दुःख आणि वेदना बाजूला सारून हजारों लोकांचे प्राण वाचवतो. मला या चित्रपटासाठी रोनी स्क्रूवाला आणि हरमन बावेजा यांच्यासोबत काम करण्याचा आनंद आहे आणि मी कार्तिकसोबत काम करण्यासाठी उत्साहित आहे. असं दिग्दर्शक हंसल मेहता यांनी म्हंटल आहे.