जशी आई तशी मुलगी, Juhi Chawla ची मुलगी तिची कार्बन कॉपी
बॉलिवूडकरांमधील स्टारकिड्स नेहमीच चर्चेत असतात. अभिनेत्री सारा अली खान, जान्हवी कपूर, खुशी कपूर, शनााया कपूर स्टार्सच्या मुली चर्चेत असतात. तर आता अभिनेत्री जुही चावलाची मुलगी जान्हवी मेहताही चर्चेत आली आहे. जुही चावलाची मुलगी जान्हवी मेहताने बॉलिवूडमध्ये येण्याआधिचं तिने सर्वांना घायाळ केलं आहे. जान्हवीला कायम कोणत्याही कार्यक्रमात किंवा पार्ट्यांमध्ये स्पॉट केलं जातं
अभिनेत्री जुही चावलाने लेकीसोबत एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये जुहीने स्वतःचा 1995 सालचा व्हिडीओ आणि मुलीचा 2022 सालचा व्हिडीओ एकत्र करुन इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. सध्या जुहीची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
जान्हवी, जूही चावला आणि जय मेहता यांची मुलगी आहे. आपल्या शाळेच्या दिवसांत जान्हवी मेहता ही अतिशय अभ्यासू होती. जान्हवी शाळेत रँक होल्डर होती. आपल्या क्लासमध्ये टॉप 10 विद्यार्थ्यांमध्ये असायची. जान्हवीने एका आंतरराष्ट्रीयन शाळेत शिक्षण घेतलं आहे.