मल्याळम चित्रपटाची बाजी! '2018'ला ऑस्करमध्ये एंट्री

मल्याळम चित्रपटाची बाजी! '2018'ला ऑस्करमध्ये एंट्री

मल्याळम चित्रपट '2018- एव्हरीवन इज अ हिरो' ने अकादमी पुरस्कार 2024 मध्ये बाजी मारली आहे. या चित्रपटाला ऑस्कर 2024 मध्ये भारतासाठी अधिकृत नामांकन मिळाले आहे.

मल्याळम चित्रपट '2018- एव्हरीवन इज अ हिरो' ने अकादमी पुरस्कार 2024 मध्ये बाजी मारली आहे. केरळच्या पूर शोकांतिकेवर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटाला ऑस्कर 2024 मध्ये भारतासाठी अधिकृत नामांकन मिळाले आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने आज ही घोषणा केली.

2018 मध्ये केरळमध्ये आलेल्या पुरामुळे राज्यात भीषण दृश्य निर्माण झाले होते. तर 483 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. केरळमधील हा पूर 100 वर्षांतील सर्वात भीषण पूर असल्याचे सांगण्यात आले. 2018 मध्ये राज्यातील या आपत्तीवर एक चित्रपट तयार करण्यात आला होता. समीक्षकांनी या चित्रपटाला शानदार म्हंटले आहे. त्यातील कथा, अभिनय आणि कलाकारांचे कौतुक झाले. टोविनो थॉमस, कांचको बाम, आसिफ अली आणि अपर्णा बालमुरली यांसारख्या स्टार्सनी मुख्य भूमिकेत काम केले. पूरग्रस्तांच्या व्यथा मांडणारा चित्रपट पाहून चित्रपटगृहांमध्येही लोक भावूक झाले होते.

'2018- एव्हरीवन इज अ हिरो' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली होती. मल्टीस्टारर सर्व्हायव्हल ड्रामा बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. हा चित्रपट 2023 मध्ये सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला आहे. चित्रपटाचे भारतातील एकूण कलेक्शन 92.85 कोटी आहे. तर जगभरात या चित्रपटाने 180 कोटींचा व्यवसाय केला. या चित्रपटाचे दिग्दर्शन ज्युड अँथनी जोसेफ यांनी केले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com