Dharmveer 2: मन उडू उडू झालं मालिकेतील 'हा' अभिनेता दिसणार धर्मवीर २ चित्रपटात

Dharmveer 2: मन उडू उडू झालं मालिकेतील 'हा' अभिनेता दिसणार धर्मवीर २ चित्रपटात

'मन उडू उडू झालं' मालिकेतील एका कलाकाराने आता मोठ्या पडद्यावर एक लोकप्रिय चित्रपटाच्या दुसऱ्या भागामध्ये दिसणार आहे.

झी मराठीमधील लोकप्रिय मालिका 'मन उडू उडू झालं' ही मालिका कमी वेळातच लोकप्रिय झाली होती. या मालिकेला प्रेक्षकांची पंसती जास्त प्रमाणात मिळाली होती. या मालिकेत अभिनेत्री ऋता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊत यांनी मुख्य भुमिका साकारले होते. याच मालिकेतील एका कलाकाराने आता मोठ्या पडद्यावर एक लोकप्रिय चित्रपटाच्या दुसऱ्या भागामध्ये दिसणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने ही बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे.

मन 'उडू उडू झालं' या मालिकेमध्ये खलनायकाची भूमिका साकारणारा ऋतुराज फडके लवकरच प्रसाद ओक यांच्या 'धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे' या सिनेमाच्या दुसऱ्या भागात दिसणार आहे. 'धर्मवीर २' या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. या सिनेमात ऋतुराज कोणती भूमिका साकारणार आहे याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

ऋतुराजने त्याच्या सोशल मीडियावर धर्मवीर २ च्या सेटवरचे फोटो शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये तर ऋतुराज दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्यासोबत फोटोसाठी पोज देताना दिसत आहे. ऋतुराजने 'मधु इथे अन चंद्र तिथे', 'झोल झाल', यांसारख्या अनेक चित्रपटांत काम केले आहे. 'मन उडू उडू झालं', 'सहकुटुंब सहपरिवार', इत्यादी मालिकांमध्ये देखील त्याने काम केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com